IIM Mumbai Bharti 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधणाऱ्या तरुणांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये संधी चालून आली आहे. यासाठी अधिककृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, रिक्त जागांचा तपशील, अर्जाची शेवटची तारीख याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत व्यवस्थापक (वित्त आणि लेखा) पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून चार्टड अकाऊंट विथ पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री मिळविणे आवश्यक आहे. मॅनेजर (फायनान्स अॅण्ड अकाऊंट) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67 हजार 700 ते 2 लाख 8 हजार 700 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
3 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. पात्रता आणि अटी पूर्ण केलेल्या उमेदवारांनी अर्ज पाठवावेत. अर्जात काही चुकीची माहिती आढळल्यास किंवा अपूर्ण असल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
नवी मुंबई पालिकेत वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्सची पदे भरले जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारीच्या 55 जागा, स्टाफ नर्स (स्त्री) च्या 49 जागा आणि
स्टाफ नर्स (पुरुष) च्या 6 जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी पदाची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून तर स्टाफ नर्स पदासाठी उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614 या पत्त्यावर पाठवायचा आहे. 31 जानेवारी 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.