वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास - नवाब मलिक

Sameer Wankhede's Birth certificate : दरम्यान, वानखेडे यांचे बर्थ सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मलिक यांनी दिले आहे.

Updated: Oct 27, 2021, 11:42 AM IST
वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास - नवाब मलिक title=

मुंबई : Nawab Malik on Sameer Wankhede's Birth certificate : ड्रग्ज पार्टीत (Mumbai Drugs Case) असलेला आंतरराष्ट्रीय माफिया NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मित्र असल्याचा  खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. दरम्यान, वानखेडे यांचे बर्थ सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मलिक यांनी दिले आहे.

तो दाढीवाला कोण, आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया पार्टीत कसा? - नवाब मलिक

जन्म प्रमाणपत्र (Birth certificate) किंवा 'निकाह नामा' (Nikah Nama) याबाबत जे मी ट्विट केले आहे ते जर त्यांनी हे चुकीचे सिद्ध केले तर मी राजकारण सोडेन, माझ्या पदाचा राजीनामा देईन. मी त्यांना (Sameer Wankhede) राजीनामा देण्यास सांगत नाही, पण कायद्यानुसार त्यांची नोकरी गमवावी लागेल, असे मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत.

ड्रग्ज पार्टीत एक आंतरराष्ट्रीय माफिया त्याच्या मैत्रिणीसोबत सहभागी झाला होता. हा दाढीवाला माफिया समीर वानखेडे यांचा मित्र आहे. सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यास ते सहज समोर येईल. आज तो दाढीवाला मोकाट आहे आणि काही लोकांना प्रसिद्धीसाठी विनाकारण पकडण्यात आले आहे, असा आरोप  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. 'एनसीबीने या दाढीवाल्याला शोधून काढावे, अन्यथा आम्ही हे सार्वजनिक करु, असे आव्हान मलिक यांनी दिले.

आज जो निकाह नामा दिला आहे, त्यावरून स्पष्ट होत आहे की वानखेडे यांनी धर्मांतर केले आहे. समीर वानखडे यांनी खोटे कागद बनवले आणि नोकरी मिळवली. त्यांची नोकरी जाणार. दोन ते सात वर्षाची शिक्षा खोटी कागदपत्रे बनवल्याच्या आरोपा खाली होते, असे नवाब मलिक म्हणाले.

दाऊद वानखेडे यांचे सर्टीफिकेट दाखवत आहेत. बाबांचे आजोबांचे पण ते सर्टीफिकेट खोटे आहेत. खरे सर्टीफिकेट दाखवा ना. मी धर्माच्या नावाखाली कोणावरही टीका करत नाही. यातून दलित मुलांची संधी हिसकावून घेतली गेली आहे. हा विषय खासगी नाही. सर्टीफिकेट खोटे असल्याचे मी सांगतोय. याची तक्रार दाखल होईल, असे मलिक म्हणाले.