मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्स प्रकरणामुळे तुफान चर्चेत आला आहे. त्याच्यासोबतचं त्याचा मित्र अरबाज मर्चेंड देखील तुरूंगात आहें. ड्रग्स प्रकरणातील 2 जणांचा जामीन मंगळवारी मंजूर झाला. त्यानंतर आज आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज आर्यन आणि अरबाजला बेल मिळणार की त्याचा कोठडीतील मुक्काम वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ड्रग्स केस प्रकरणी आर्यन आणि अरबाज 2 ऑक्टोबरपासून तुरूंगात आहेत.
दरम्यान, अरबाजची प्रकृती चिंताजनक आहे. एका महिन्याच्या आत अरबाजचं 7 किलो वजन कमी झालं आहे. मुलाच्या प्रकृतीबद्दल वडील असलम मर्चेंड यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, 'जामीन सुनावणीचा तपशील जाणून घेण्यासाठी आज सकाळी मी त्याची भेट घेतली. मला माझ्या मुलाच्या तब्येतीची काळजी आहे. त्याचे एका महिन्यात 7 किलो वजन कमी झाले आहे. तुरुंगात त्याला मिळणारे अन्न चांगले नाही आणि तो आधीच चिंतेने त्रस्त आहे.'
असलम पुढे म्हणाले, 'अरबाजला मला मिठी मारायची होती, पण तो करू शकला नाही आणि त्यामुळे मी खूप भावूक आणि असहाय झालो. मी एक असा बाप आहे जो आपल्या मुलाला मिठीही देवू शकत नाही. निष्पाप मुलांना खटल्यापूर्वीच शिक्षा होऊ नये.'
'मी तिथून निघताना अरबाज मला म्हणाला, 'पापा, मी आर्यनला तुरुंगात एकटे सोडणार नाही आणि आर्यनला इजा होऊ नये. आम्ही सगळे इथे एकत्र आलो आणि एकत्रच इथून निघू...' त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.