शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर...

   शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून माध्यमांमध्ये सांगण्यात आली. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 7, 2017, 08:05 PM IST
शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर...  title=

मुंबई :   शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून माध्यमांमध्ये सांगण्यात आली. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

शिवसेना सत्तेत येण्यापूर्वीपासून अस्वस्थ आहे. नंतर सरकारमध्ये आल्यानंतरही शिवसेना अस्वस्थ आहे. त्यांना मंत्रीपदातही दुय्यम असे मंत्रीपद देण्यात आल्याने त्यांची अस्वस्थता अजून वाढली. एनडीएत शिवसेनेला काहीच महत्त्व राहिलेले दिसत नाही. त्यात नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याची संकेत देऊन भाजपने शिवसेनेची अस्वस्था आणखी वाढवली. 

अशा परिस्थितीत शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर काय समिकरणे होतील.

 

पहिली शक्यता 

भाजप + इतर = एकूण + गरज 
१२२ + १६     = १३८     + ७ 

दुसरी शक्यता

भाजप + राष्ट्रवादी  = एकूण 
१२२ + ४१              = १६३ 

तिसरी शक्यता 

शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस = एकूण 

६२         + ४१          + ४२     = १४५