Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंच

राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

Updated: Jan 12, 2022, 07:42 PM IST
Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंच title=

मुंबई : राज्यातील आणि शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत (Maharashtra Corona) मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ही रुग्णसंख्या काहीशी स्थिरावताना दिसतेय. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी राज्यातील कोरोना स्थिती आढावा घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी राज्यातल्या कोरोना स्थितीची माहिती पत्रकार परिषद दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यात केव्हा लॉकडाऊन लागणार, याबाबतची माहिती त्यांनी दिली. (if demand for oxygen reaches 700 metric tonnes we will lock down in state says maharashtra health minister rajesh tope)  

लॉकडाऊन केव्हा लागणार? 

"राज्याला आज ऑक्सिजनची मागणी ४०० मेट्रीक टन इतकी आहे. यापैकी 250 नॉन कोविड आणि 150 मेट्रीक टन कोविड रुग्णांसाठी लागत आहे. ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनवर गेली, की आपण लॉकडाऊन लावणार आहोत" असं टोपेंनी ठणकावून सांगितलं.

पत्रकार परिषदेतील महत्तवाचे मुद्दे

राज्यातील लसीकरणावरुन टोपे यांनी प्रतिक्रिया दिली. "लसीकरण दर कमी होताना दिसत आहे. दररोज 6 लाख 50 हजार लोकांचं लसीकरण होतंय. तर कमाल 8 लाख लोकांना लस मिळतेय. लसीकरणाला वेग दिल्या आहेत", असं आरोग्यमंत्री म्हणाले. 

राज्यातील लसवंताची टक्केवारी 

"राज्यात आतापर्यंत 67 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर  90 टक्के लोकांचं एक डोस पूर्ण झाला आहे. तसेच 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाखालील वयोगटातील 35 टक्के मुलाचं लसीकरण झालंय", असं टोपेंनी सांगितंल. 

लसी कमी पडतायेत 

कोव्हॅकिसन अणि कोविशिल्ड लस कमी पडतेय त्याबाबत मुख्यमंत्रीकडून मागणी केली जाणार आहे. कोव्हॅकसिन आपण लहान मुलांना देतोय, त्याची मागणी जास्त आहे. आपल्याला कोव्हॅकसिनच्या ६० लाख आणि कोविशिल्डच्या ४० लाख लसींची गरज असल्याचं टोपेंनी सांगितलं. 

शाळांबाबतचा निर्णय काय? 

शाळांबाबत मंत्रीमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शाळा अजून 15 ते 20 दिवस शाळा बंदच ठेवाव्या असं ठरलं. त्यानंतर आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.