HSC: बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जाणार

बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जाणार आहे.

Updated: Jun 11, 2021, 06:01 PM IST
HSC: बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जाणार title=

दीपक भातुसे, मुंबई :  कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी आणि बारावीच्या आतापर्यंतच्या महाविद्यालयांनी स्तरावरील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे.

मूल्यांकनाची कार्यपद्धती नंतर ठरवली जाणार आहे. तसेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्याबाबत नंतर निर्णय जाहीर केला जाणार आहे.  शिक्षण विभागाने याबाबत आज निर्णय जारी केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आणि तिसऱ्या लाटेचा इशारा यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देण्यात आली होती. 'सीबीएसईने निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्य मंडळांनीही बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  पण मुल्यांकनाबाबत सरकारपुढे प्रश्न होता. पण याबाबतही आज निर्णय घेण्यात आला.

दहावीची बोर्ड परीक्षा याआधीच रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर बारावीच्या परीक्षा ही रद्द झाल्याने पालकांना ही मोठा दिलासा मिळाला आहे.