Good News : राज्याचे पोलीस दल होणार बळकट, 50 हजार पदांची भरती

Maharashtra Police recruitment : राज्याचे पोलीस दल बळकट करण्यात येणार आहे.  

Updated: Dec 29, 2021, 10:57 AM IST
Good News : राज्याचे पोलीस दल होणार बळकट, 50 हजार पदांची भरती title=

मुंबई : Maharashtra Police recruitment : राज्यात पोलिसांच्या 50 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात घोषणा केली. आर आर पाटील यांच्या काळातल्या घोषणे पैकी उर्वरीत पदे भरली जाणार आहे. (Home Minister Dilip Walse Patil's big announcement regarding Maharashtra Police recruitment)

राज्याचे पोलीस दल बळकट करण्यासाठी 50 हजार पदांची भरती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत घोषणा केली. राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे त्यांनी मान्य केले. 

आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी 60 हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी 10 हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित 50 हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.