मुंबई: मेट्रो तीनच्या कामासंदर्भात राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मेट्रो तीनच्या रात्रीच्या कामाला हिरवा कंदील दिला. त्यामुळे आता मेट्रोचे काम रात्री सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय.
या निर्णयामुळे आता मेट्रो तीनच्या कामाला गती मिळणार आहे. काम अपेक्षित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. ध्वनी प्रदूषणामुळे काही रहिवाशांनी मेट्रो तीनच्या रात्री काम बंद ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कामावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे रात्रीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.