मुंबईत जोरदार पाऊस; द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, High Tideची शक्यता

Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत सकाळपासून सुरु असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  

Updated: Jul 13, 2022, 10:35 AM IST
मुंबईत जोरदार पाऊस; द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, High Tideची शक्यता title=

मुंबई : Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत सकाळपासून सुरु असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सांताक्रुज, विलेपार्ला, अंधेरी, जोगेश्वरी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुंबईत आज सकाळी 11.44 वाजता मोठी भरती असणार आहे. (Mumbai High Tide)  भरतीदरम्यान 4.68 मीटर्सच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर मुसळधार पावसासह वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर कोणीही जाऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत पावसाचा जोर कमालीचा वाढलाय. मुंबई, शहर उनगर सर्वच भागात जोरदार पाऊस पडतोय. मुंबईत काही भागात अतिजोरदार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय. मुंबईत वादळीवारे 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. मुंबईत अनेक भागात पावसाचा जोर रात्रीपासूनच पाहायला मिळत आहे. दादर, सायन, वांद्रे, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. 

Mumbai Rain Update: Here's what Indian Railways is doing for a smooth travel amid heavy downpour

पुढील 2 ते 3 तासांत पावसाचा जोर आणखी वाढेल अशी शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे लोकल सेवा उशिराने सुरू आहे. रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. बेस्ट बसेसचे मार्ग बदलण्यात आलेत.  मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरुय. त्यामुळे अंधेरी सब वे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंधेरी सबवे मध्ये पाणी भरल्यामुळे पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जाण्यासाठी वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आलाय. महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरुय.

संपूर्ण राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असल्याचे दिसून येते आहे. (Maharashtra Heavy Rain Alert ) काही भागांत पावसाने दाणादाण उडवून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान विभागने आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसची शक्यता असल्याचा माहिती दिली आहे. सकाळचे काही तास या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.