मुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा

येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 

Updated: Jul 7, 2018, 11:27 PM IST
मुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा title=
(Picture: Twitter/@ANI)

मुंबई : येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. 

दरम्यान, मुंबई आणि शहर परिसता पावसानं सध्या विश्रांती घेतलीय. मात्र सकाळपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु होता. या पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाल्याचे पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पश्चिम द्रुतगती मार्गावर सुरु असलेले मेट्रोचे काम आणि त्यात मुसळधार पाऊस यामुळे इथली वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. 

नागपुरात जोरदार पावसाचा इशारा

 दरम्यान हवामान खात्यानं नागपुरात आजही जोरदार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे आज नागपूरात आज शाळांना सुट्टी देण्यात आलीये. दरम्यान शुक्रवारी नागपूरला पावसानं  झोडपल्यानंतर नागपुरात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय.  शुक्रवारी झालेल्या पावसानं नागपूरचं जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वेसेवा कोलमडून पडली. आजही कोल्हापूर गोंदीया महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आलीये.. या पावसानं शहरात एकाचा बळी घेतलाय.  पावसामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाह वाढला होता. या पाण्याच्या प्रवाहात निलेश चावके हा तरुण वाहून गेलाय. तर महालगाव कापसी गावातीलही एक तरुण पावासाच्या पाण्यात वाहून गेलाय. 

शहापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी

रायगडात पावसाची संततधार सुरुच

रायगड जिल्‍हयात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. महाडमध्‍ये पूरस्थिती निर्माण झाली असून बाजारपेठेतील अनेक भागांमध्‍ये पाणी घुसलं आहे . पाऊस थांबत नसल्‍याने सावित्री नदीची पाणी पातळी आता 8 मीटरच्‍या वर पोहोचली आहे . त्‍यामुळे संपूर्ण परीसर जलमय झाला आहे . महाड शहरात येणारे दोन्‍ही मार्ग बंद आहेत .  नागरीकांना सतर्कतेचे आदेश देण्‍यात आले आहेत . नगरपालिका तसेच महसूल प्रशासनाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. अनेक ठिकाणी शाळांना सूटी देण्‍यात आली आहे .  इकडे सुधागड तालुक्‍यात सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पाली खोपोली मार्गावरील आंबा व जांभुळपाडा नदीला पूर आला असून दोन्‍ही ठिकाणच्‍या पूलांवरून पाणी वाहू लागले आहे . त्‍यामुळे हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्‍यात आले आला आहे .  जुन्‍या मुंबई – पुणे महामार्गावर कलोते येथे रस्‍त्‍यावर पाणी आल्‍याने वाहतूक काही ठिकाणी वळवण्‍यात आली आहे . रेल्‍वे रूळांवर पाणी आल्‍याने कर्जत पनवेल व कर्जत – मुंबई वाहतूकीवर परीणाम झाला आहे.

 महड ते रायगड रस्‍ता पाण्‍याखाली

रायगड जिल्'€à¤¹à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पावसाने झोडपलं

रायगड जिल्‍हयाच्‍या बहुतांश भागात पाऊस सुरू असून दक्षिण रायगड मधील महाड आणि पोलादपूर तालुक्‍यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्‍यामुळे महाड शहराच्‍या दोन्‍ही बाजूंनी वाहणाऱ्या गांधारी आणि सावित्री या दोन्‍ही नद्यांनी  धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची धोकापातळी 6.50 मीटर असून पावसामुळे पाण्‍याची पातळी 6.60 मीटरवर पोहोचली आहे. शहरातील दस्‍तुरी नाक्‍यावर पाणी आलं असून महड ते रायगड रस्‍ता पाण्‍याखाली गेला आहे. नाते रस्‍ताही पाण्‍याखाली गेला आहे. त्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्‍यात आली आहे. महड आणि परिसरात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर महड शहराला पुराचा धोका संभवतो आहे. महाड नगरपालिकेनं शहरातील नागरिकांना धोक्‍याचा इशारा दिला आहे. तसंच सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

खेडमध्ये मुसळधार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलीय.पावसामुळे पुरपातळीत वाढ झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग मागील  दोन तासापासून ठप्प झालाय. खेड बोरघर इथं नदीचं पाणी महामार्गावर आल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.  दरम्यान  या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाले आहेत. 

नागपुरात मुसळधार पावसामुळे एकाचा बळी

१५५ विद्यार्थी पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर 

चंद्रपुरात नागरिक आणि शिक्षकांनी तब्बल १५५ विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढलंय...  कोरपना तालुक्यातील वडगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेलगत नाल्याला पूर आला होता.. या नाल्याच्या संरक्षक भिंतींची उंची कमी असल्यानं पुराचं पाणी बाहेर आलं.. त्यामुळे शाळेत १५५ विद्यार्थी अडकून पडले होते.. अखेर शिक्षक आणि नागरिकांनी मानवी साखळी तयार करून या सर्वांची सुखरुप सुटका केली. तब्बल तीन तास हा सुटकेचा थरार सुरु होता.. विद्यार्थी सुखरुप सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला..