राज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार

राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय

Updated: Apr 19, 2023, 02:41 PM IST
राज्यात पारा चाळीशीपार,  दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार  title=

Heat Wave in Maharashtra : राज्यात उष्णतेचा कहर सुरु असून उष्णतेच्या लाटेने (Heat Wave) जनजीवन प्रभावित झालं आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणं अवघड बनलं आहे. त्यात आता पुढील चार दिवस उष्णतेची लाट येणार आहे असा इशारा हवामान खात्यानं (Meteorological Department) दिलाय. राज्यातील अनेक भागात पारा चाळीशी पार गेला असून विदर्भापेक्षा ठाणे जिल्हाच अधिक तापलाय. मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील कर्जतमध्ये सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर मुरबाड तालुक्यातही 44 अंश तापमान नोंदवण्यात आलंय. विदर्भात चंद्रपुरात सर्वाधीक तापमानाची नोंद झाली असून पारा 43 अंशावर गेलाय. (Highest temperature ever recorded in Thane)

राज्य सरकारला आली जाग
दरम्यान, झी 24 तासच्या भूमिकेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. आता दुपारी 12 ते 5 या दरम्यान कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. राज्य सरकार तसा अध्यादेश (Ordinance) काढणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढांनी (Mangal Prabhat Lodha) दिली आहे. उष्माघातामुळे (Heat Stroke) महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमानंतर 14 बळी गेले. अशी दुर्दैवी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी सरकारनं यापुढे सकाळी 10 ते 5 यावेळेत खुल्या मैदानावरच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी. 15 जूनपर्यंत असे खुल्या मैदानातले कार्यक्रम या वेळेत घेऊ नयेत, अशी भूमिका झी 24 तासनं घेतली. झी 24 तासच्या याच भूमिकेनंतर जागं झालेलं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे,

कोणत्या भागात पारा चाळीशीपार गेलाय पाहूयात.

मुंबईकरांसाठी उष्णतेबाबत सूचना 
1. तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
2. हलके, हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे घाला. 
3. उन्हात बाहेर जाताना गॉगल, छत्री/टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.
3. प्रवासात पाणी आणि कांदा सोबत ठेवा.
4. मद्यपान, चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स टाळा.
5. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
6. पार्क केलेल्या गाड्यांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
7. आजारपण किंवा अशक्तपणा वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
8. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडया ठेवा.

उष्माघात झाल्यास काय कराल? 
1. व्यक्तिला थंड जागी, सावलीखाली ठेवा. 
2. तिला/त्याला ओल्या कपड्याने पुसून काढा किंवा वारंवार शरीर धुवा. 
3. उष्माघात झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान कमी करा.
4. व्यक्तिला 'ओआरएस' प्यायला द्या किंवा लिंबू सरबतासारखे पेय द्या.
5. व्यक्तिला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा.