मुंबई : आईस्क्रीम आणि उन्हाळ्याचं तसं जवळचं नातं, मात्र आईस्क्रीम खाताना काळजी घ्या. कारण आईस्क्रीममध्ये आरोग्याला अपायकारक पदार्थ वापरले जात असल्याचं उघड झालंय. असे पदार्थ वापरून आईस्क्रीम तयार करणा-या मुंबईतल्या कंपन्यांवर अन्न आणि औषध विभागानं छापे घातले आहेत. कांदिवलीच्या चारकोपमधल्या दिप्ती डेझर्ट या आईस्क्रीमच्या कारखान्यावर आणि दहिसरच्या कांदळपाडामधल्या सुपर स्टार मीना आईस्क्रीम पार्लरवर छापे घातले आहेत. दोन्ही ठिकाणी आईस्क्रीममध्ये अपायकारक पदार्थ आढळून आले आहेत. आईस्क्रीममध्ये मुदत संपलेले रंग आणि पदार्थांचा वापर होत असल्याचं आढळून आलंय. अन्न औषध विभागाने १० किलो मलाई कुल्फी १० किलो व आइसक्रीम बटर स्कॉच १७८ लीटर जप्त केला.
अन्न औषध विभागाने कांदिवालीतील उत्पादन कंपनीतून ५२ हजार ७०० रुपयांचे आइस्क्रीम जप्त केले असुन आइस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अन्न व औषध विभागानं तब्बल ५२ हजार रुपयांची आईस्क्रीम जप्त केली आहेत. अधिक तपासासाठी या आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.