दंडापासून वाचण्यासाठी त्याने घातला जीव धोक्यात

एका १८ वर्षाच्या तरुणाने मेट्रो रेल्वेकडून होणाऱ्या दंडापासून वाचण्यासाठी ३० फुटांवरून उडी मारली. एवढ्या उंचावरून उडी मारल्यानंतरही तरूण सुखरूप बचावला आहे. घाटकोपरच्या मेट्रो स्थानकावर रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.

Updated: Jun 27, 2017, 07:39 PM IST
दंडापासून वाचण्यासाठी त्याने घातला जीव धोक्यात title=

मुंबई : एका १८ वर्षाच्या तरुणाने मेट्रो रेल्वेकडून होणाऱ्या दंडापासून वाचण्यासाठी ३० फुटांवरून उडी मारली. एवढ्या उंचावरून उडी मारल्यानंतरही तरूण सुखरूप बचावला आहे. घाटकोपरच्या मेट्रो स्थानकावर रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
मूळचा ओडिशा येथे राहणारा राजकुमार मुंबईमध्ये कामासाठी आला होता. त्याने सांगितले की, साकीनाका स्थानकातून मेट्रोत बसलो आणि घाटकोपरला आलो. पण घाटकोपरला आल्यानंतर बाहेर पडण्यासाठी टोकन ऑटोमेटिक फेअर कलेक्शनमध्ये टोकन टाकल्यानंतर गेट उघडलाच नाही.
त्यावेळी राजकुमारने बाहेर पडण्यासाठी उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला सुरक्षा रक्षकांनी अडवून चौकशी सुरू केली आणि राजकुमारला दंड भरण्यास सांगितले तेव्हा राजकुमार पळू लागला आणि तीन मजली रेल्वे इमारतीवरून त्याने बाहेर रस्त्यावर उडी मारली.
त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन घाटकोपर पोलिसांच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकुमारने घाटकोपरच्या प्रवासासाठी टोकन घेतले होते पण त्याने एका तासात प्रवास सुरू करण्याऐवजी स्टेशनवर फिरत होता त्यामुळे टोकन टाकल्यानंतर गेट उघडला नाही.