हार्बर लोकल सेवा विस्कळीत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अपघात

Harbor Railway service disrupted​ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म नंबर एक येथे लोकलचा डबा रुळावरुन खाली घसरल्याने हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.  

Updated: Jul 26, 2022, 12:00 PM IST
हार्बर लोकल सेवा विस्कळीत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अपघात title=
संग्रहित छाया

मुंबई : Harbor Railway service disrupted : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म नंबर एक येथे लोकलचा डबा रुळावरुन खाली घसरल्याने हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, दोन नंबर प्लॅटफॉर्म रेल्वे सेवा सुरु असली तरी ती बिलंबाने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा काही प्रमाणात खोळंबा होत आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलला जाणाऱ्या लोकलचा शेवटचा डबा रुळावरुन घसरला. शेवटचा डबा हा डेड एंडला धडकल्याने हा अपघात झाला. त्यामुळे गाडीचा डबा रुळावरुन खाली घसरला. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्लॅटफॉर्म दोनवरुन गाड्या चालविण्यात येत आहेत. मात्र, या गाड्या विलंबाने धावत आहेत.