महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाची साईट हॅक, हॅकर्सकडून पॉर्न साईट लिंक

महाराष्ट्र उच्च व तंत्र विभागाची साईट हॅक

शैलेश मुसळे | Updated: Sep 3, 2019, 01:28 PM IST
महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाची साईट हॅक, हॅकर्सकडून पॉर्न साईट लिंक title=

संजय पाटील, मुंबई : महाराष्ट्र उच्च व तंत्र विभागाची साईट हॅक झाली आहे. या साईटवर गेल्यानंतर सर्वात शेवटी आधारच्या लोगोवर क्लिक केल्यास एक पॉर्न साईट ओपन होत आहे. अशा प्रकारे याआधीही सरकारी साईट हॅक झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाची उच्च व तंत्र शिक्षण विभागाची ग्रंथालय संचालनालयाची ही साईट आहे.

याआधी पाकिस्तानमधून देखील अनेक भारतीय साईट हॅक झाल्या आहेत. पण हे प्रकरण आताच समोर आलं आहे. आधार संबंधित अनेक गोष्टी लोकं नेटवर सर्च करत असतात. त्यामुळे आधारलाच हॅकरने लक्ष्य करत त्याला पॉर्न साईट लिंक केली गेली आहे.