गोरेगाव फिल्मसिटीत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एकजण जखमी

मुंबईतील गोरगाव येथील फिल्मसिटीजवळील उंच भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अनेक वेळ मदत आणि बचाव कार्य सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य केले. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 25, 2024, 08:06 AM IST
गोरेगाव फिल्मसिटीत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एकजण जखमी  title=

मुंबईतील गोरगाव येथील फिल्मसिटीजवळील उंच भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अनेक वेळ मदत आणि बचाव कार्य सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य केले. 

मुंबईतील गोरेगाव परिसरातील फिल्मसिटीजवळ शनिवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला. येथे प्राइम फॉक्स प्रोडक्शनच्या मागे असलेल्या फिल्मसिटी गेट क्रमांक 2 जवळ 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईच्या गोरेगाव भागात प्राइम फॉक्स प्रोडक्शनच्या मागे फिल्मसिटी गेट क्रमांक 2 जवळ भिंत कोसळली. 

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील फिल्म सिटी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीय. भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक कामगार जखमी झाला आहे. जखमी कामगाराला जोगेश्वरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.. मृत झालेले दोघेही तरुण हे मजूर म्हणून काम करत होते..गोरेगाव फिल्म सिटीमधील प्राइम फोकस लिमिटेड येथील इमारतीजवळ ही दुर्घटना घडली आहे. 

कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यांखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आलं. यामध्ये 32 वर्षीय सिंतू मंडल, 45 वर्षीय जयदेव बिसवास यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. विक्रम मंडल या दुर्घटनेत किरकोळ जखणी झाला असून त्याला उपाचर करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते.