मुंबई : गोरेगावमध्ये रविवारी सकाळी निर्माणाधीन असलेली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून आठजण जखमी झाले आहेत. या जखमींवर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अजूनही काहीजण अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. गोरेगावातील म्हाडा वसाहतीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रामू असे मृत व्यक्तीचे नाव असून तो २२ वर्षांचा होता. तो बांधकाम मजूर असल्याचे सांगितले जाते.
#Visuals #Maharashtra: 1 person dead, 8 injured in the collapse of a portion of an under-construction building near Azad Maidan in Goregaon; NDRF present at the spot pic.twitter.com/o97s8whGfj
— ANI (@ANI) December 23, 2018
#Maharashtra: 1 person dead, 8 injured in the collapse of a portion of an under-construction building near Azad Maidan in Goregaon; NDRF present at the spot pic.twitter.com/xLpls8xOER
— ANI (@ANI) December 23, 2018
#Maharashtra: Death toll rises to 3 in the collapse of a portion of an under-construction building near Azad Maidan in Goregaon
— ANI (@ANI) December 23, 2018
सविस्तर वृत्त लवकरच