पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, विरार स्थानकातून लोकल

डहाणूवरुन पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी  बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना करावी लागणारी कसरत थांबणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 2, 2017, 12:10 PM IST
पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, विरार स्थानकातून लोकल title=

मुंबई : डहाणूवरुन पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी  बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना करावी लागणारी कसरत थांबणार आहे. 

पालघर आणि  डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणा-या प्रवाश्यांना मोठा दिलासा  मिळणार आहे. पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी ही गाडी डहाणू  स्टेशनवरून निघून विरारला यायची. मात्र त्यानंतर गाडी बदलावी लागत होती. आता ती वेळ येणार नाही.

डहाणू लोकल विरारपर्यंत धावत होती. तिथून परत गाडी बदलत  प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करायचे आता ही लोकल बोरिवली  स्थानकापर्यंत येणार असल्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय टळली आहे.