Good News : पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा निर्णय प्रतीक्षेत   

Updated: Nov 2, 2020, 05:45 PM IST
Good News : पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर प्रचंड प्रमाणात ताण येणार असला तरीही कर्मचाऱ्यांची Diwali 2020 दिवाळी चांगल्या पद्धतीनं साजरा व्हावी यासाठी आयुक्त इक्बाल चहल आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील असल्याचं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक चांगली बातमी दिली. 

सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर केलं. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून १५५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर केलं. 

पालिका आयुक्त चहल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा बोनस जाहीर केला. अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना ७७५० रुपये, मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक ४७०० रुपये, अनुदान प्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक यांना २३५० रुपये बोनस देण्यात येणार आहे. 

 

महापौरांनी जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणं पालिका कामगारांच्या बोनसमध्ये यंदाच्या वर्षी ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे या बोनसमुळं पालिकेच्या तिजोरीवर जवळपास १५५ कोटींचा आर्थिक भारही येणार आहे. असं असतानाही कोरोना काळात आपल्या जीवाला धोका पत्करुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठीच आपण प्रशासनाकडे आग्रही असल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं. 

बेस्ट कामगार आणि इतर यांच्या बोनस बाबत विचार होऊल आयुक्तांशी बोलणे सुरू आहे त्याबाबत सकारात्मक निकाल निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.