घाटकोपर इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर

घाटकोपर इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल आयुक्त अजोय मेहतांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये  सुनिल शितपचाच बेजबाबदरापणा कारणीभूत ठरवण्यात आला आहे. पिलर तोडल्यामुळेच बिल्डींग पडली. तसंच एन वॉर्डमधील कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याचं म्हटलं आबे. या अहवालात एन वॉर्डच्या स्थानिक वैद्यकीय अधिका-यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त विनोद चिठोरे आणि उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या चौकशी समितीने हा अहवाल तयार केला आहे.

Updated: Aug 23, 2017, 03:52 PM IST
घाटकोपर इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर title=

मुंबई : घाटकोपर इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल आयुक्त अजोय मेहतांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये  सुनिल शितपचाच बेजबाबदरापणा कारणीभूत ठरवण्यात आला आहे. पिलर तोडल्यामुळेच बिल्डींग पडली. तसंच एन वॉर्डमधील कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याचं म्हटलं आबे. या अहवालात एन वॉर्डच्या स्थानिक वैद्यकीय अधिका-यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त विनोद चिठोरे आणि उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या चौकशी समितीने हा अहवाल तयार केला आहे.

अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना संबंधित अधिका-यांची पुन्हा चौकशी करून कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शितपची एन व एस वॉर्डात अनधिकृत बांधकामे असल्याचे अहवालात म्हटलं आहे. शितपच्या या अनधिकृत बांधकामावर कायद्यानुसार लवकर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सहा महिन्यात करण्याचे आदेशही आयुक्त अजोय मेहतांनी दिले आहेत.