मुंबई : घाटकोपर येथील सिद्धी-साई इमारत दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. मुंबईतील घाटकोपर येथील सिद्धी-साई इमारत काल सकाळी पावणे अकारच्या दरम्यान कोसळली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले.
सिद्धी-साई इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याने दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर रुग्णालय होते. या रुग्णालयाचे नूतनीकरण करताना इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लावण्यात आला. या प्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितपविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आलेय.