मुंबई : एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना आता एक मोठी बातमी आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. CBI ने 10 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
बेकायदा कृत्य केल्याचा संजय पांडे यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे CBI कडून 10 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. संजय पांडेसह NSE माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण विरूद्ध कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी संजय पांडे यांना ईडीने समन्स जारी केला होता.
ईडीच्या समन्सनंतर 5 रोजी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आता CBI कडून 10 ठिकाणी धा़डी टाकल्या आहेत. त्यामुळे संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोण आहेत संजय पांडे?
संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.