Rupali Patil | रुपाली पाटलांच ठरलं, उद्या हातात बांधणार घड्याळ

रुपाली पाटील (Rupali Patil Thombre) या मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) स्थापनेपासून त्या पक्षात होत्या.  

Updated: Dec 15, 2021, 09:33 PM IST
Rupali Patil | रुपाली पाटलांच ठरलं, उद्या हातात बांधणार घड्याळ   title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena) रामराम ठोकलेलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका आणि नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) या उद्या 16 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationlist Congress Party) प्रवेश करणार आहेत. मुंबईत (Mumbai) त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. (former mns leader and corporater rupali patil thombre will entire to ncp in presense of deputy chief minister ajit pawar and jayant patil on 16 december at mumbai)  

रुपाली पाटील या उद्या मुंबईत पक्षप्रवेश करतील. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.     

रुपाली पाटील यांनी मंगळवारी 14 डिसेंबरला नेते अनिल शिदोरे (Anil Shidore) यांच्याडकडे आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी याआधीच एका मुलाखतीत पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते.

कोणती जबाबदारी मिळणार? 

राष्ट्रवादीत पक्ष प्रेवश केल्यानंतर रुपाली पाटील यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.  

मनसेला मोठा धक्का

मनसेप्रमुख राज ठाकरे हे आजपासून पुढील 3 दिवस पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात पुढील काळात निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आणि पक्षबांधणीसाठी राज ठाकरे राज्यातील विविध जिल्ह्यात दौरे करत आहेत.

मात्र त्यांच्या दौऱ्याआधी रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला. तसेच त्यांच्यासोबत कार्यकर्तेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे मनसेसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का समजला जात आहे. 

कोण आहेत रुपाली ठोंबरे पाटील?

रुपाली ठोंबरे पाटील या पुणे महानगरपालिकेतील मनसेच्या माजी नगरसेविका राहिल्या आहेत. तसेच त्या झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात सामाजिक पातळीवर अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. 

रुपाली पाटील या मनसेच्या स्थापनेपासून त्या पक्षात होत्या. मात्र मनसेतील काही लोकांमुळे पक्ष सोडला. मात्र राजसाहेब यांचाबाबत नेहमीच आदर राहिल, असं त्या म्हणाल्या.