तीन अज्ञातांकडून बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स मालकावर बेछूट गोळीबार

पोलिसांकडून तपास सुरू 

Updated: Jun 30, 2021, 12:18 PM IST
तीन अज्ञातांकडून बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स मालकावर बेछूट गोळीबार  title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : दहिसर पूर्व गावडे नगर परिसरात ओम साईराज ज्वेलर्सवर तीन अज्ञात व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून दुकानाची लूट केले आहे. दुकानदार याला बंदुकीने गोळी लागली आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. सध्या आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून तपास केला जात आहे घटनास्थळी सध्या पोलिस तपास केला जात आहे.

सकाळी 10.15 वाजता ही घटना घडली आहे. तीन आरोपी बाईकवरून आले होते. दुकानदार दुकान उघडून बसला होता. खरेदी करण्याच्या बहाण्याने या तिघांनी दुकानात प्रवेश केला. तिघांनी लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथे ज्वेलर्स मालका व्यतिरिक्त कुणीच नव्हतं. 

अज्ञात चोरांना विरोध केल्यामुळे बंदुकीची गोळी मालकावर झाडण्यात आली. यामध्ये दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. काही माल घेऊन तिनही आरोपी फरार झालेत आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस पुढील तपास घेत आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले आहेत. या काळात फक्त सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं सुरू आहे.