मुंबई : सलमान खानचा बॉडीगार्ड शेराविरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शबनम नावाच्या तरुणीने शेराविरोधात तक्रार दाखल केली होती. बिग बॉसमधील वादानंतर शबनम हिने झुबेरला मदत करत पाठिंबा दर्शवला होता.
यानंतर संतापलेल्या शेराने फोन करुन आपल्याला शिवीगाळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप शबनमने तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरुन शेराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.