मुंबै बँकेच्या सर्वसाधरण सभेत जोरदार खडाजंगी, संचालकावर गुन्हा दाखल

मुंबै बँकेच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळात झालेल्या अभूतपूर्व वादावादीनंतर मुंबईतल्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Jan 31, 2018, 10:14 AM IST
मुंबै बँकेच्या सर्वसाधरण सभेत जोरदार खडाजंगी, संचालकावर गुन्हा दाखल title=

मुंबई : मुंबै बँकेच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळात झालेल्या अभूतपूर्व वादावादीनंतर मुंबईतल्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

सर्वसाधरण सभेत जोरदार खडाजंगी

भाजपप्रणित संचालक मंडळ आणि शिवसेनाप्रणित संचालक मंडळात सर्वसाधरण सभेत जोरदार खडाजंगी झाली. बँकेचे संचालक भिकाजी पारले यांनी शिवागाळ केल्याची तक्रार संचालिका जयश्री पांचाळ यांनी केलीय. 

भिकाजी पारले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी याप्रकरणी भिकाजी पारले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई जिल्हा सहकार बोर्डाच्या निवडणूकीतल्या परिणामांचे पडसाद बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बघायला मिळाले. निवडणूकीत भाजपप्रणित पॅनलनं शिवसेना प्रणित पॅनलवर मात केली. भिकाजी पारले शिवसेनाप्रणित पॅनलचे सदस्य होते.