मुंबई : नव्या कोऱ्या २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटेचे लोकांमध्ये असलेले आकर्षण आता कुठे ओसरू लागले आहे. तोवरच सरकार १०० रूपायांचे नवे नाणे चलणात आणत आहे. जाणून घ्या १०० रूपयांच्या नाण्यांची खास वैशिष्ट्ये..
- १०० रूपयांचे नाणे १०० मिलिमिटरचे असून, त्याचे वजन ३५ ग्रॅम इतके असणार आहे.
- नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र दिसेल. या चित्राच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते ही अक्षरे झळकतील. तर, अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर, दुसऱ्या बाजूला इंडिया लिहिलेले असेल.
- चांदी, कॉंपर, निकेल, झिंक अशा धातूंच्या मिश्रणापासून हे नाणे बनवले जाईल.
- नाण्याच्या एका बाजूला डॉ. एम. जी. रामचंद्रन यांची प्रतिमा छापलेली असेल.
नाण्याचे वजन ३५ ग्राम तर, आकार ४४ मिलिमिटर इतका असेन.
दरम्यान, १०० रूपयांच्या नाण्यासोबतच लॉंच करण्यात येणाऱ्या ५ रूपयांच्या नाण्याचा आकार २३ मिलिमिटर इतका असेल.