मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने काल उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या आणि महिला सुरक्षेच्या मुद्यावर सरकारकडून आज विधानसभेत उत्तर दिले जाणार आहे. तर गृहनिर्माण विभागावरील मागील आठवड्यात अपूर्ण राहिलेली चर्चा आज पुढे सुरू होऊन या चर्चेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उत्तर देतील.
#Headline । शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आज विधानसभेत सरकार देणार उत्तर, गृहनिर्माण विभागातली अपूर्ण चर्चाही पूर्ण करणार, अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईबाबत सरकारच्या भूमिकेकडेही लक्ष pic.twitter.com/DFm0ps1GvH
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 3, 2020
मुंबई आणि परिसरातील रखडलेल्या एसआरए, म्हाडा आणि इतर प्रकल्पांबाबत गृहनिर्माण मंत्री काय उत्तर देतात त्याकडे लक्ष असेल. तर सत्ताधारी पक्ष कोकणच्या विकासावर आज चर्चा उपस्थित करणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला सरकारकडून येणाऱ्या उत्तरात अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीबद्दल सरकार काय भूमिका मांडणार याकडेही सगळ्यांचे लक्ष असेल.
0