शेतकरी संपाचा दूध पुरवठ्यासह भाजीपाला, अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम

राज्यभरातल्या शेतक-यांनी उद्या १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. शेतक-यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 31, 2017, 06:55 PM IST
शेतकरी संपाचा दूध पुरवठ्यासह भाजीपाला, अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम title=

मुंबई : राज्यभरातल्या शेतक-यांनी उद्या १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. शेतक-यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं दूध पुरवठ्यासह भाजीपाला आणि अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकारमार्फत सुरू झालेत. संपकरी शेतक-यांना सरकारनं पुन्हा एकदा चर्चेचं निमंत्रण दिलीय. शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.

कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातल्या शेतक-यांनी उद्या १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली बोलणी निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. 

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा हे गाव शेतकरी संपाचं केंद्र ठरलंय. गेल्या सहा दिवसांपासून पुणतांब्यातील शेतकरी धरणं आंदोलन करत आहेत. शेतक-यांच्या या संपाला कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच दूध उत्पादक संघानं पाठिंबा जाहीर केला आहे. 
संपाच्या पहिल्या टप्प्यात शेतकरी दूध आणि भाजीपाल्याची विक्री थांबवणार आहेत. त्यामुळं आगामी काळात नागरिकांना दूध, भाजीपाला, फळ तुटवडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. 

राज्यातील जवळपास सर्व बाजार समिती उद्या बंद असणार आहे. त्याशिवाय कृषी सेवा केंद्र आणि बी बियाणं दुकानं देखील बंद राहणार आहेत. 

दरम्यान, शेतक-यांच्या या आंदोलनात तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकारमार्फत सुरू झालेत.  संपकरी शेतकऱ्यांना सरकारनं पुन्हा एकदा चर्चेचं निमंत्रण दिलंय. शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये, असं आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.