...आणि कर्जमाफीची १५ नोव्हेंबर डेडलाईन निघून गेली

कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. त्यामुळेच शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास दिरंगाई होत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं होतं. 

Updated: Nov 19, 2017, 10:58 AM IST
...आणि कर्जमाफीची १५ नोव्हेंबर डेडलाईन निघून गेली title=

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेत घोटाळा झाला असल्याचा पुनरुच्चार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. त्यामुळेच शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास दिरंगाई होत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं होतं. 

15 नोव्हेंबर होती डेडलाईन

त्यावेळी राजू शेट्टी यांच्या आरोपाला उत्तर देताना आयटी विभागाचे सचिव विजय गौतम यांनी 15 नोव्हेंबर ही डेडलाईन दिली होती. 

अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत

सर्व पात्र शेतक-यांच्या खात्यावर 15 नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा होतील, असं गौतम यांनी म्हटलं होतं. मात्र, 15 नोव्हेंबरनंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळं आपण केलेला आरोप खरा असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. कर्जमाफीतील आयटी घोटाळ्याच्या चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.