तुमचे बॅंक लॉकर सुरक्षित आहे का ?

बॅंकांतील लॉकर देखील सुरक्षित नाही हे स्पष्ट झाले आहे.

Updated: Nov 18, 2017, 09:51 PM IST
तुमचे बॅंक लॉकर सुरक्षित आहे का ?  title=

अजित मांढरे, झी मिडीया, मुंबई : नवी मुंबईत बॅंका ऑफ बडोदाच्या ग्राहक लॉकरमधील ३० लॉकर फोडून मोठा दरोडा घालण्यात आल्याची घटना समोर आली. यानिमित्तानं बॅंकांतील लॉकर देखील सुरक्षित नाही हे स्पष्ट झाले आहे.

बॅंकेने हात वर केले 

या लॉकर दरोड्यानंतर बँकेनं नियम पुढं करून हात वर केले. मग या चोरीला गेलेल्या वस्तुंची भरपाई कोण करणार, असा प्रश्न लॉकरधारकांना पडला आहे.

जबाबदार कोण ?

 लोक विश्वासानं आपल्या मौल्यवान वस्तू बँकेत ठेवतात. आता त्या चोरीला गेल्यानं याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकच खळबळ

जुईनगर सेक्टर ११ मधील ही आठ मजली भक्ती रेसिडन्सी इमारतीच्या तळमजल्यावर आठ व्यावसायिक गाळे आहेत. त्यातील चार गाळ्यांत बँक ऑफ बडेदाची शाखा आहे. याच बँकेतल्या ३० लॉकरमधून तब्बल २ कोटी रूपयांची लूट झाल्यानं एकच खळबळ उडाली.

पथक रवाना 

भूयार खोदून चोरट्यांनी ही रक्कम लुटली असून, हे भुयार खोदण्याचं काम पाच महिने सुरू होतं, असं प्राथमिक तपासात आढळलंय. या गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथकं उत्तरांचल आणि उत्तर प्रदेशला रवाना झाले.