Fact Check : 87% भारतीय 2025 पर्यंत कॅन्सरग्रस्त? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

भेसळयुक्त दुधामुळे 2025 पर्यंत 87 टक्के भारतीयांना कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा आहे. 

Updated: Nov 17, 2022, 12:01 AM IST
Fact Check : 87% भारतीय 2025 पर्यंत कॅन्सरग्रस्त? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? title=

MILK CANCER : तुम्ही दूध पित असाल तर भेसळयुक्त दूध (Adulterated Milk) पित नाही ना याची खात्री करा. कारण, भेसळयुक्त दूध प्यायल्याने 2025 पर्यंत 87 टक्के भारतीय कॅन्सरग्रस्त (Cancer) होतील असा दावा करण्यात आलाय. पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं हे आपण जाणून घेऊयात. (fact check viral polkhol adulterated milk could put 87 percent of indians at risk of cancer by 2025 know what true what false)

भेसळयुक्त दुधामुळे 2025 पर्यंत 87 टक्के भारतीयांना कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच (WHO) असा इशारा दिल्याचा दावा करण्यात आल्याने यामुळे भीती निर्माण झालीय. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण दूध पितो. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही या दाव्याची पोलखोल करण्यासाठी पडताळणी सुरू केली. पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा.

व्हायरल मेसेज

भारतात 68.7% दूध भेसळयुक्त विकलं जातं. या भेसळयुक्त दुधामुळे 2025 पर्यंत 87 टक्के भारतीयांना कॅन्सर होणार. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आलंय. हा दावा केल्यानं आम्ही याची पोलखोल सुरू केली. खरंच डब्लूएचओनं असा सर्व्हे केलाय का? भेसळयुक्त दुधामुळे कॅन्सरचा धोका आहे का? याची पडताळणी केली त्यावेळी काय पोलखोल झाली पाहुयात. 

व्हायरल पोलखोल

WHO ने भेसळयुक्त दुधासंदर्भात सरकारला इशारा दिलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल केलेला दावा खोटा आहे. 2025 पर्यंत 87 टक्के लोकांना कॅन्सर होईल यात तथ्य नाही. भेसळयुक्त दूध आरोग्यास हानिकारक आहेच. त्यामुळे आपणही काळजी घ्यायलाच हवी. पण, भेसळयुक्त दुधामुळे 2025 पर्यंत 87 टक्के लोकांना कॅन्सर होईल असा सर्व्हे WHO ने केल्याचा दावा असत्य ठरला.