मुंबई : आयकर (lTR File ) परतावा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी आयटी फाईल केली नसेल त्यांना संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर परतावा भरण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबात माहिती दिली. याबाबत सीबीडीटीने ट्विट केले आहे.
आयकर परतावा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून आता ३१ ऑक्टोबरपर्यंत आता आयकर परतावा भरता येणार आहे. तसेच केवळ आयकर परतावाच नाही तर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची अंतिम तारीख ३२ सप्टेंबर होती. तीदेखील वाढवून ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे.