EsselWorld Bird Park: पक्षीप्रेमींसाठी मोठी बातमी; एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क दोन वर्षानंतर पुन्हा खुले

एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क (EsselWorld Bird Park) आता सुरू करण्यात आलेय. त्यामुळे पक्षीप्रेमींना आता पुन्हा एकदा पक्ष्यांचा किलबिलाट आणि रंगबेरंगी पक्षी अनुभवता येणार आहेत.  

Updated: May 17, 2022, 04:04 PM IST
EsselWorld Bird Park: पक्षीप्रेमींसाठी मोठी बातमी; एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क दोन वर्षानंतर पुन्हा खुले title=

मुंबई :  कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे अनेक पर्यटन स्थळे, उद्याने इतर स्थळांना टाळे ठोकण्यात आले होते. मात्र आता हळूहळू कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर हीच पर्यटन स्थळे,उद्याने खुली करण्यात आलीत. त्याचप्रमाणे एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क (EsselWorld Bird Park)
देखील आता सुरू करण्यात आलेय. त्यामुळे पक्षीप्रेमींना आता पुन्हा एकदा पक्ष्यांचा किलबिलाट आणि रंगबेरंगी पक्षी अनुभवता येणार आहेत.  

एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क  (EsselWorld Bird Park) हे प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञांनी विकसित केलेले भारतातील पहिले विदेशी पक्षी उद्यान आहे. या उद्यानात देशातीलचं नव्हे तर विदेशातील पक्ष्यांना राहता येईल असे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या उद्यानात तब्बल 500 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, यासोबत जगभरातील 50 पक्षी या उद्यानात आहेत, जसे Blue Gold Macaw,African Gray Parrot,Rainbow Lorikeet असे विविध प्रजातीचे पक्षी या उद्यानात पाहता येणार आहेत.  

निव्वळ हे पक्षी तुम्हाला बघायलाच मिळणार असे नाही आहे, तर  तुम्हाला पक्ष्यांसोबत फोटो काढता येणार आहे. त्यांना आपल्या हाताने त्यांचे जेवण भरवता येणार आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनाला ब्रेक देऊन या उद्यानात पक्ष्यांसोबत एक अल्हाददायक वातावरण अनुभवता येणार आहे.

मुंबईतलं हे भलं मोठं पक्षी उद्यान आता सुरु झालंय. त्यामुळे तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल तर नक्की मुंबईतल्या या एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्कला भेट द्या. तुम्हाला या उद्यानात पक्षांसोबत सुंदरशा हिरवळीने नटलेल्या या ठिकाणाचाही आनंद घेता येणार आहे. तुम्हीचं नव्हे तर तुमचं संपूर्ण कुटूंब या उद्यानाला भेट देऊन तुमचा विकेंड शानदार बनवू शकता.