मुंबई : 'झी 24 तास' या मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आघाडीच्या मराठी वाहिनीने ''उडान'' या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. उदयोन्मुख, प्रयोगशील, नव्या दमाच्या उद्योजकांचा ''उडान'' हा गौरव सोहळा 26 नोव्हेंबर 2021 रोजी पार पडणार आहे. आपणास माहित आहे ''झी 24 तास'' समाजातील सर्वस्तरातील वेगवेगळ्या क्षेत्रात, सर्वोत्तम काम करणाऱ्या, आपल्या सृजनशीलतेने संबंधित क्षेत्रात वेगाने पुढे येणाऱ्यांचा गौरव करण्यात नेहमी 'एक पाऊल पुढे' असते.
'उडान'च्या निमित्ताने प्रेरणा देणाऱ्या या उद्योजकांच्या कहाण्या जगासमोर येणं गरजेचं आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रात अतिशय वाईट परिस्थितीतूनही नवे उपक्रम घेऊन नवे तरुण उद्योजक घडण्यास हातभार लावता येईल, ही एक साधी अपेक्षा आहे.
'उडान' या कार्यक्रमांला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह, महाराष्ट्राचे केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यात उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. काही उद्योजक सत्कार सोहळ्याला उत्तर देताना आपले अनुभव कथन करणार आहेत, तर मान्यवरांकडून नवउद्योजकांना मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे.