Engineers Day : डोंबिवलीतल्या इंजिनीयर तरुणाचा फ्लिपकार्टला लाखोंचा गंडा

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा नावाजलेल्या कंपन्यांची केली फसवणूक

Updated: Sep 15, 2022, 07:06 PM IST
Engineers Day : डोंबिवलीतल्या इंजिनीयर तरुणाचा फ्लिपकार्टला लाखोंचा गंडा title=

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : आपला देश आणि समाज प्रगत होण्यासाठी अभियंत्यांचे (Engineers) मोठं योगदान आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही देशाला पुढे जाणे अवघड आहे. त्यामुळेच आज अभियंत्यांच्या (Engineers) सन्मानार्थ जागतिक अभियंता दिन (Engineers Day) साजरा केला जातो. भारताचे महान अभियंते मोक्षमुंडम विश्वेश्वरय्या (mokshagundam visvesvaraya) यांच्या स्मरणार्थ हा विशेष दिवस साजरा केला जातो.

15 सप्टेंबर या दिवशी अभियंते मोक्षमुंडम विश्वेश्वरय्या (mokshagundam visvesvaraya) यांचा जन्म झाला होता. 1968 मध्ये, भारत सरकारने अभियंत्यांच्या सन्मानार्थ 15 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी या तारखेला अभियंत्यांच्या (Engineers) सन्मानार्थ जागतिक अभियंता दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ अभियंत्यांना सन्मानित करण्यासाठीच नव्हे तर प्रशिक्षणार्थी अभियंत्यांना भविष्यात उत्कृष्ट योगदान देण्यासाठी प्रेरित करण्यासाठी साजरा केला जातो.

मात्र आता एका उच्च उच्चशिक्षित अशा अभियंत्याने ऑनलाइन कंपनीला (Online Fraud) घातला लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. एम.टेक असलेल्या तरुणाने स्वतःची एक टोळी बनवून ऑनलाईन कंपनीला लाखोंचा गंडा घातला आहे. 

ऑनलाइन वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून महागड्या वस्तू मागत या टोळीने फसवणूक केली. यासाठी बनावाट आधार कार्डचाही वापर करण्यात आला होता. मात्र डोंबिवली (dombivli) मानपाडा पोलिसांनी या अभियंत्या तरुणासह त्याच्या टोळीला अटक केली आहे.

कल्याणमध्ये (Kalayn) राहणारा रॉबिन आहुजा या उच्चशिक्षित तरुणाने ऑनलाइन कंपन्यांना गंडा घालण्यासाठी स्वतःची एक टोळी तयार केली होती. ही टोळी ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या नावाजलेल्या कंपनीकडून महागडे मोबाईल,टॅब,लॅपटॉप मागवत असत.

या वस्तू मागवण्यासाठी ते प्रत्येक वेळी नवीन सिम कार्डचा वापर करुन फोनवरुन ऑर्डर करायचे .मात्र हे सिम कार्ड विकत घेण्यासाठी त्यांनी बनावट आधार कार्ड देखील तयार केली होती. बनावट आधार कार्डच्या माध्यमातून या सगळ्या वस्तू ही टोळी मागवायची.विशेष म्हणजे गुजरात, कोलकत्ता ,पुणे, मुंबई ,सातारा, अलिबाग या ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली या टोळीने दिली आहे.

या टोळीकडून तब्बल सहा लाख रुपयांचे महागडे मोबाईल फोन, लॅपटॉप, आयपॅड ,सिम कार्ड आणि बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच सिम कार्ड खरेदी करण्यासाठी मदत करणाऱ्या सिम कार्ड विक्रेत्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.  उच्चशिक्षित असलेल्या आरोपीने फक्त मौजमजेसाठी आणि झटपट पैसा कमवण्याच्या उद्देशाने ही टोळी तयार केली होती.मात्र पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.