मुंबई : मुंबईतल्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांची संख्या २३ वर पोहोचलीये.
सतेंद्रकुमार कनौजिया या जखमीवर केईएम रूग्णालयात उपचार सुरु होते. त्याचा उपचारादरम्याम मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २३ वर पोहोचलाय.
शुक्रवारी सकाळी एलफिन्स्टन स्टेशनच्या ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांना आपला नाहक जीव गमवावा लागला होता. तर ३५हून अधिक जण जखमी झाले होते.
या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आलीये.