पुन्हा एकदा विधानसभेत एकनाथ खडसेंनी मांडल्या वेदना

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या वेदना मांडल्या. 

Updated: Mar 6, 2018, 01:34 PM IST
पुन्हा एकदा विधानसभेत एकनाथ खडसेंनी मांडल्या वेदना title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या वेदना मांडल्या. 

काय म्हणाले एकनाथ खडसे?

आरोप झाले की आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. मात्र जे खोटे आरोप करतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. माझ्यावर एकापाठोपाठ आरोप झाले. मात्र एकाही आरोपात तथ्य निघालं नाही. माझ्या पीएने ३० कोटीची लाच घेतल्याचाही आरोप झाला, पण चौकशीत काहीच आढळलं नाही. मागील दोन वर्ष मी चौकशीच्या फेऱ्यात अडकलो आहे. 

सगळ्या चौकशा झाल्या, पण....

सीआयडी, एसीबी आणि आयटी, लोकायुक्त या सगळ्या चौकशा झाल्या, पण काहीही आढळलं नाही, असं सांगत खडसे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या वेदना विधानसभेत मांडल्या. हा सांगतानाच असे खोटे आरोप करणाऱ्या लोकांवर काय कारवाई करणआर हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे अशी मागणी खडसे यांनी केली.

‘खोट्या तक्रारी करून बदनाम’

खडसेंनी मांडलेल्या या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी खोट्या तक्रारी करून बदनाम केलं जात असल्याचं मान्य केलं. तसंच काही लोक जाणिवपूर्वक खोट्या तक्रारी करत असतील तर त्याचे काय करायचे याबाबत विधिमंडळाच्या समितीने निर्णय घ्यायला हवा अशी भूमिका मांडली.