एकनाथ खडसे यांचे होणार मंत्रीमंडळात कमबॅक?

 पुण्याच्या एमआयडीसी भोसरी जागा प्रकरणी नेमलेल्या एक सदस्यीय समितीचे झोटींग यांनी चौकशी अहवाल मुख्यमंत्री यांना सादर केला आहे. तेव्हा आता एकनाथ खडसे यांचे मंत्रीमंडळात कमबॅक होणार यावर चर्चा सुरु झाली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 5, 2017, 08:55 PM IST
 एकनाथ खडसे यांचे होणार मंत्रीमंडळात कमबॅक? title=

मुंबई :  पुण्याच्या एमआयडीसी भोसरी जागा प्रकरणी नेमलेल्या एक सदस्यीय समितीचे झोटींग यांनी चौकशी अहवाल मुख्यमंत्री यांना सादर केला आहे. तेव्हा आता एकनाथ खडसे यांचे मंत्रीमंडळात कमबॅक होणार यावर चर्चा सुरु झाली आहे. 

मात्र सध्याची परिस्थीती बघता खडसे यांना परत मंत्रीमंडळात घेणे हे सरकारला विशेषतः मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून..

- भोसरी एमआयडीसी जमिन खरेदी प्रकरणावरुन एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- या प्रकणाची चौकशी करण्याकरता निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांची समिती नेमली होती

- झोटिंग यांनी अहवाल मुख्यमंत्र्य़ाना सादर केला आहे, अहवालात काय म्हटंले आहे हे अजुन गुलदस्त्यात.

- मात्र जमिन खरेदी प्रकरणाच्या तुलनेत खडसे यांना शिक्षा खूप झाली असा एक मतप्रवाह आहे.

- तेव्हा अहवाल सादर झाल्यानंतर आता खडसे परत येणार का यावर चर्चा सुरु झाली आहे.

- मुख्यमंत्री मात्र झोटींगच्या अहवालाबाबत मौन बाळगून आहेत.