ईडीला वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही - संजय राऊत

 Maharashtra Political Crisis : ईडीला (ED) वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही असं संजय राऊत म्हणाले. 

Updated: Jun 28, 2022, 11:40 AM IST
ईडीला वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही - संजय राऊत title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या डबक्यात पडू, नये असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. नाही तर फडणवीस, भाजप आणि मोदी यांची प्रतिष्ठा जाईल, असे राऊत म्हणाले. गुवाहाटीला गेलेल्या काहींशी संपर्क आहे. त्यांना आम्ही बंडखोर म्हणत नाही, असं राऊत म्हणाले. ईडीला (ED) वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही असं राऊत म्हणाले. 

शिंदे अजूनही आमचे सहकारी असून, त्यांच्याशी कोणतीही वैयक्तिक कटुता नाही. त्यांनी परत यावे, असे संजय राऊत यांनी म्हटलेय. पक्षाचे कार्यक्रम माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीसाठी जाणार नाही, ईडीला वाटत असेल तर मला त्यांनी अटक करावी, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

सध्या राज्यात सुरु असलेले राजकारण हे डबक झाले आहे. या डबक्यात फक्त बेडूकच उड्या मारतात. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे फडणवीसांनी या डबक्यात उतरु नये, असे केल्यास फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल, असा सल्ला राऊत यांनी  देवेद्र फडणवीस यांना दिला आहे.

 सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयाने 11 जुलैपर्यंत या बंडखोरांना आराम मिळाला आहे. यानंतर बंडखोरांना महाराष्ट्रात यावंच लागेल. त्यामुळे सध्यातरी या बंडखोरांचे महाराष्ट्रात काहीच काम नसल्याचे राऊत म्हणाले. ठाकरेंनी काय करावे, हे गुवाहाटीत बसून आम्हाला सांगू नये. आसाममधील काहीजण आमच्यासाठी बंडखोर नाहीत त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये यावे. पक्षप्रमुखांसमोर आपली मते मांडावी आणि प्रश्न सोडवावेत असे ते म्हणाले.