पोलीस प्रोटेक्शन बाहेर असताना दिशा सालियानचा सामुहिक बलात्कार; नारायण राणेंचा गंभीर आरोप

Narayan rane on Sushant sing rajput case : 'दिशा सालियानची आत्महत्या नव्हे तर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या झाली आहे. त्याच प्रकरणात पुढे अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या करण्यात आली' असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

Updated: Feb 19, 2022, 11:51 AM IST
पोलीस प्रोटेक्शन बाहेर असताना दिशा सालियानचा सामुहिक बलात्कार; नारायण राणेंचा गंभीर आरोप title=

मुंबई : 'दिशा सालियानची आत्महत्या नव्हे तर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या झाली आहे. त्याच प्रकरणात पुढे अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या करण्यात आली' असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या जुहू बंगल्याला बीएमसीने नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

'माझ्या जुहूतील घरात मी 17 सप्टेंबर 2009 साली आलो. या इमारतीचे पूर्णत्वाचे सर्वप्रकारचे कागदपत्र महापालिकेने मला दिले होते. त्यानंतर आजवर एक इंचही मी बांधकाम केले नाही. माझ्या कुंटूंबाला अतिरिक्त बांधकाम करण्याची गरज वाटली नाही. मातोश्रीकडून काही लोकांना तक्रार करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार गेल्या काही वर्षापासून पुन्हा पुन्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. त्यात काहीही अयोग्य आढळलेले नाही. तरीही विनाकारण नोटीसा पाठवण्यात येत असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

'8 जून रोजी दिशा सालियानची बलात्कार करून आत्महत्या करण्यात आली. तिला पार्टीला जायचे नव्हते, तरी तिला तिच्या रोहन राय नावाच्या मित्राने थांबवले. तरीही ती घरी निघाली. त्यानंतर तेथे कोण कोण होतं? तिच्यावर बलात्कार होत असताना पोलीस प्रोटेक्शन कोणाला मिळत होतं? दिशा सालियानच्या पोस्ट मॉर्टमचा रिपोर्ट अद्याप आला नाही. ती ज्या इमारतीत राहायची, त्या दिवसाची ८ जूनची पाने फाडण्यात आली. ती गायब आहेत.' असा गंभीर आरोप राणे यांनी केला.

तिच्याविषयी सुशांत सिंहला कळाल्यावर त्याने म्हटले की, 'मै इन लोगो को छोडूंगा नही'. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्यात त्याची हत्या करण्यात करण्यात आली. तेथे कोणत्या मंत्र्याची गाडी होती. सीसीटीव्ही फूटेज गायब कसे झाले. ठरावीक मानसांची एम्बुलन्स कशी आली. सर्व पुरावे कसे नष्ट करण्यात आले. त्यात कोणते अधिकारी होते. हे लवकरच उघड होणार आहे.असा गंभीर आरोप देखील राणे यांनी केला आहे.