Whats App ची नवी पॉलिसी तुम्ही अॅक्सेप्ट केली का? तर तुमची प्रायव्हसी धोक्यात

तुमच्या फोनमधील व्हॉट्सअपला आता तुमची सगळी माहिती मिळणार.

Updated: Jan 8, 2021, 12:47 PM IST
Whats App ची नवी पॉलिसी तुम्ही अॅक्सेप्ट केली का? तर तुमची प्रायव्हसी धोक्यात title=

विशाल पांडे, मुंबई : व्हॉट्सअपची नवी पॉलिसी तुंम्ही अॅक्सेप्ट केली असेल तर तुमची प्रायव्हसी धोक्यात येण्याची शक्यता आहे. देशात बर्फवृष्टी पाहायला तुम्ही मनाली जात आहात की शिमल्याला... ही माहिती तुमच्या मित्रांना मिळो न मिळो. पण तुमच्या फोनमधील व्हॉट्सअपला मात्र नक्की मिळेल. व्हॉट्सअपची नवी पॉलिसी तुम्ही अॅकसेप्ट केली असेल तर तुमची सगळी माहिती व्हॉट्सअपला समजत आहे. 

२४ तास तुम्ही ट्रॅक केले जात आहात. मोबाईल घेऊन तुम्ही कोणत्या लोकेशनवर जाता, व्हॉट्सअप कॉलिंगवरून कोणाशी संपर्क साधता, काय बोलता याची माहिती व्हॉट्सअपवर असेल. 

व्हॉट्सअपचं प्रत्येक व्हर्जन युजर्सची चिंता वाढवतंय. नवी पॉलिसी अक्सेप्ट केल्या वर तुमची प्रायव्हसी सार्वजनिक झाली. व्हॉट्सअपद्वारे तुम्ही पैशांची देवाणघेवाण केली तर ती माहितीही व्हॉट्सअपकडे जाईल. 

म्हणजे तुम्ही कोणाला, किती पैसे पाठवले, कधी पाठवले ही सगळी माहिती व्हॉट्सअपपाशी असेल. तुमच्या ट्रान्सॅक्शनची माहितीही इतर कोणाला पाठवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

विशेष म्हणजे या अटी मान्य करण्याशिवाय तुमच्याकडे पर्यायही नाही. मात्र या हेरगिरीपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे कोणताही ऑप्शन नाही. म्हणजेच तुम्हाला व्हॉट्सअप वापरायचं असेल तर अटी मानण्यावाचून पर्याय नाही. व्हॉट्सअप डिलीट करायचं असेल तर त्यासाठीही व्हॉट्सअपच्या सेटींग्जमध्ये जाऊन आपल्या फोन नंबरसह डिलीट माय अकाऊंट हा पर्याय निवडावा लागेल. मात्र आता हे संकट हीच भारतासाठी नवी संधी असल्याचं सायबर एक्सपर्ट मानतात. 

व्हॉट्सअपची नवी पॉलिसी तुमची प्रायव्हसी भंग करणारी आहे. तुमची वैयक्तिक माहिती अन्य प्लॅटफॉर्मवर जाण्याची शक्यता गंभीर आहे. या माहितीचा वापर कोण कसा करेल याची गॅरेंटी कोण घेणार हा कळीचा मुद्दा आहे.