#Coronavirus धारावीतून आणखी एक आनंदाची बातमी

मुंबईतही कोरोनाच्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 

Updated: Jul 13, 2020, 06:59 PM IST
#Coronavirus धारावीतून आणखी एक आनंदाची बातमी title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: जागतिक आरोग्य संघटनेने WHO प्रशंसा केल्यानंतर सध्या चर्चेचे केंद्र झालेल्या धारावीतून सोमवारी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. धारावीत सोमवारी कोरोनाचे केवळ सहा नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीतील एक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता १०० पेक्षा कमी झाली आहे. धारावीत आतापर्यंत २३८१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सध्याच्या घडीला धारावीत केवळ ९६ एक्टिव्ह रुग्णच आहेत. तर धारावीला लागून असलेल्या माहीम आणि दादरमध्ये अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. दादरमध्ये सोमवारी १९ तर माहीममध्ये कोरोनाचे १३ नवे रुग्ण आढळून आले. 

'भाजपने धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती'
 
तर दुसरीकडे मुंबईतही कोरोनाच्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर १ जुलै  रोजी १.६८ टक्के होता. हा दर काल (१२ जुलै २०२०) १.३६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. याचाच अर्थ रुग्ण वाढ मंदावत असून प्रशासन आपले घोषित लक्ष्य गाठण्यात यशस्वी होताना दिसत आहे. २२ जून २०२० रोजी मुंबईत उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सुमारे ५० टक्के होते.  १ जुलै २०२० रोजी हे प्रमाण ५७ टक्के झाले. तर १२ जुलै २०२० रोजी हा दर ७० टक्के झाला आहे. तसेच मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेटही ५० दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. 

श्रेय कधी आणि कुठे घ्यायचं याचं भान ठेवा, राऊतांनी भाजपला सुनावले