Mangal Puri : इंस्टास्टार लेडी कंडक्टरबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

एसटी महामंडळाची (Msrtc) प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी मंगल सागर पुरी (Mangal Puri) आणि त्यांचे सहकारी वाहक कल्याण कुंभार यांना निलंबित करण्यात आलं होतं.  

Updated: Oct 13, 2022, 11:27 PM IST
Mangal Puri : इंस्टास्टार लेडी कंडक्टरबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय title=
Mangal Puri

मुंबई : एसटीमध्ये (Msrtc) व्हीडिओ आणि रिल्स केल्यामुळे महिला वाहक मंगल पुरी (Mangal Puri) यांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत मंगल पुरी यांच्यासोबत असलेले चालक यांचंही निलंबन केलं गेलं होतं. एसटी महामंडळाच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर (Social Media) नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. या कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घेण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर करण्यात आली होती. यानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (dharashiv instastar lady conductor mangal puri suspension finally cancelled by msrtc)

धाराशिवमधील इंस्टास्टार लेडी कंडक्टर मंगल पुरींचं निलंबन अखेर रद्द करण्यात आलय. झी 24 तासच्या बातमीनंतर ही कारवाई मागे घेण्यात आलीय. एसटीमधील स्वत:चे व्हीडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी कळंब आगारातील लेडी कंडक्टर मंगल सागर यांच्यावर एसटी महामंडळानं कारवाई केली होती. 

एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी मंगल सागर पुरी आणि त्यांचे सहकारी वाहक कल्याण कुंभार यांना निलंबित करण्यात आलं होतं. याप्रकरणी झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर अखेर एसटी महामंडळानं निलंबन मागे घेतलंय. तत्काळ कामावर रूजू व्हा असे आदेश मंगल पुरींना देण्यात आले आहेत.