हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला, कॉल डिटेल्समध्ये या अभिनेत्रीचं नाव समोर

घाटकोपर भागात राहणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी घरी काही वेळातच परत येतो असं सांगून बाहेर पडला होता

Updated: Dec 8, 2018, 09:50 AM IST
हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला, कॉल डिटेल्समध्ये या अभिनेत्रीचं नाव समोर title=

मुंबई : नवी मुंबईच्या पनवेल भागात मुंबईच्या एका हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. हा व्यापारी २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होतात. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर या व्यापाऱ्याची कार पोलिसांना सापडली होती. कॉल डिटेल्स खंगाळून काढल्यानंतर पोलिसांसमोर वेगवेगळी माहिती उघड होताना दिसतेय. या व्यापाऱ्याच्या कॉल डिटेल्समधून तो अनेक बार गर्ल्स आणि टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींशी संपर्कात असल्याचं उघड होतंय. याच संदर्भात पोलिसांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री 'गोपी बहू' अर्थात देवोलीना भट्टाचार्जी हिच्यासहीत जवळपास २० जणांची चौकशी केलीय. 

हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला
हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला

पोलिसांच्या माहितीनुसार, घाटकोपर भागात राहणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी घरी काही वेळातच परत येतो असं सांगून बाहेर पडला होता. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो परतला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी मुंबईच्या पंतनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. 

या संदर्भात पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलंय. राजेश्वर दुसऱ्याच एका गाडीतून नवी मुंबईच्या दिशेनं जाताना या फुटेजमधून दिसतंय. 

देवोलीना भट्टाचार्जी
देवोलीना भट्टाचार्जी 

७ डिसेंबर रोजी नवी मुंबीच्या पनवेल भागातील झाडाझुडपांत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता... परंतु, त्याची ओळख पटवणं कठिण होतं. राजेश्वर यांचे कपडे आणि बूटांची ओळख पटवल्यानंतर हा मृतदेहाची ओळख पटली. 

यानंतर पोलिसांनी राजेश्वर यांचे कॉल डिटेल्स काढले.... यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि रायगडच्या अनेक बार गर्ल्सच्या नावांचा समावेश आहे. 

देवोलीना भट्टाचार्जी
देवोलीना भट्टाचार्जी

यामध्ये एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश होता. 'साथ निभाना साथिया' या टीव्ही कार्यक्रमातील 'गोपी बहू'ची भूमिका निभावणारी देवेलीनाचंही नाव या कॉल डिटेल्समधून समोर आलं. 

एसीपी मान सिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आत्तापर्यंत जवळपास २० जणांचा जबाब नोंदवलाय.