देवेंद्र फडणवीसांच्या खिशात गोपीचंद पडळकरांना दिसले 10-20 शरद पवार, काय म्हटले पाहा

10-20 शरद पवार देवेंद्र फडणवीसांच्या खिशात दिसले गोपीचंद पडळकरांना, नेमकं काय म्हटलं पाहा  

Updated: Mar 11, 2022, 01:45 PM IST
देवेंद्र फडणवीसांच्या खिशात गोपीचंद पडळकरांना दिसले 10-20 शरद पवार, काय म्हटले पाहा title=

मुंबई : चार विधानसभेतल्या निकालानंतर राज्यात भाजप (BJP) विरुद्ध महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) असं युद्ध रंगलं आहे. भाजपने आता 'मिशन महाराष्ट्र' हाती घेतलं आहे.  'युपी झांकी है, महाराष्ट्र बाकी है' अशा घोषणा देत भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याला सूचक उत्तर दिलं आहे. 'महाराष्ट्र बाकी आहे असं म्हणत असाल तर महाराष्ट्र तयार आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  निकालांचा महाराष्ट्रात कुठलाही मोठा बदल होणार नाही. मोठ्या बदलासाठी भाजपला आणखी काही वर्षे थांबावं लागेल, असं पवार म्हणाले. 

गोपीचंद पडळकर यांची बोचरी टीका
शरद पवार यांनी दिलेल्या या वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बोचरी टीका केली आहे. 'शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीत. त्यांच्या विषय म्हणजे काहीजरी केलं तरी मीच केलं, माझ्यापेक्षा कोण पुढे जाता कामा नये, पण असे दहा-वीस शरद पवार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) खिशात घालून फिरतात' 

शरद पवार यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचं आहे. विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधातील भूमिका जी शरद पवार यांच्याकडे आहे, तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आहे, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

राष्ट्रवादी काय उत्तर देणार?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि पडकर यांच्या संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.