Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायदा?

मात्र देशात हा कायदा लागू करण्यापूर्वी राज्यातच आधी लागू होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

Updated: Oct 14, 2022, 01:27 PM IST
Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायदा?  title=

मुंबई : देशात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू झाला पाहिजे अशी मागणी होतेय. त्यात महाराष्ट्रात (Maharashtra) समान नागरी कायदा लागू होईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिलेत. हा कायदा लागू झाल्यावर नेमकं काय होईल? पाहुयात एक रिपोर्ट. देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागलीय. मात्र देशात हा कायदा लागू करण्यापूर्वी राज्यातच आधी लागू होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. (dcm devendra fadnavis has hinted that uniform civil code will be implemented in maharashtra)

समान नागरी कायदा अस्तित्वात असलेलं सध्या देशात गोवा हे एकमेव राज्य आहे. आता उत्तराखंडमध्येही समान नागरी कायदा लागू होतोय. पण हा कायदा आल्यानं नेमकं काय होईल पाहुयात.

समान नागरी कायद्यामुळे काय होईल? 

सध्या प्रत्येक धर्मासाठी विवाह, संपत्ती याबाबत स्वतंत्र कायदा. सर्व धर्मांना विवाह, घटस्फोट, मालमत्ता, दत्तक यासाठी एकच कायदा लागू होईल. आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. विवाह आणि संपत्तीसाठी सर्वधर्मीयांसाठी एकच नियम. एकीकडे राज्यात हा कायदा लागू होईल असे संकेत मिळतायत तर या कायद्याला अनेक स्तरातून विरोध होतोय.

राज्यात शिंदे-ठाकरे वादामुळे आधीच राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता समान नागरी कायद्याबाबत फडणवीसांनी संकेत दिल्यामुशे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.