कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, मुंबईत मिळेल 62 हजारपर्यंत पगार

Mumbai Customs Driver Recruitment 2024: मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 2, 2024, 02:08 PM IST
कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, मुंबईत मिळेल 62 हजारपर्यंत पगार title=

Mumbai Customs Driver Vacancy 2024: दहावी उत्तीर्ण आहात आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण दहावी उत्तीर्णांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक असलेले उमेदवार नोटिफिकेशनमधील माहिती तपासून अर्ज करु शकतात. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला वाहन चालक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच ड्रायव्हिंग परवाना असलेल्या उमेदवारांनाच ही नोकरी मिळू शकते. 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना नोकरी दिली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

Govt Job: दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा अधिक नसावे. चालक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला त्याच्यावयानुसार दरमहा 19 हजार ते 63 हजार 200 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

घरबसल्या चांगली कमाई करण्याचे 7 पर्याय

चालक पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई- 400001 या पत्त्यावर ऑफलाइन माध्यमातून पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा अर्जात चुकीची माहिती भरल्यास किंवा चुकीची कागदपत्रे आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

20 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा