मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण महासंचालनालयाला म्हणजेच 'डीजीसीए'ला म्हटलं आहे, विमान प्रवासामध्ये प्रवाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबाबत तडजोड होऊ नये, असं म्हटलं आहे, तसेच इंडिगो आणि गो एअर सारख्या कंपन्यांच्या, वादग्रस्त इंजीनची तपासणी करण्याचे निर्देश, डीजीसीएला दिले आहेत.
प्रवासी हरीश अगरवाल यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, इंडिगो आणि गो एअर कंपन्यांतील 'प्रॅट' आणि 'व्हिटनी' या इंजिनमुळे विमानाला धोका निर्माण होऊ शकतो. हरिश यांनी जनहित याचिका टाकून न्यायालयात हा दावा केला आहे.
हरिश यांच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली. याबाबत आवश्यक ती उपाययोजना आणि तपासणी कंपनीने सुरू केली आहे, असे दोन्ही कंपन्यांतर्फे सांगण्यात आले. संचालनालयाने याबाबत तपासणी केली आहे. आवश्यक त्या सूचना कंपनीला केल्या आहेत, असे केंद्र सरकारतर्फे अद्वैत सेठना यांनी स्पष्ट केले आहे.