मुंबई महापालिका रुग्णालयात उपचार महागणार

मुंबई महापालिका रुग्णालयांतील उपचार आता महागणार आहेत. 

Updated: Jan 17, 2018, 10:12 AM IST
मुंबई महापालिका रुग्णालयात उपचार महागणार title=

मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयांतील उपचार आता महागणार आहेत. 

मुंबईकरासाठी २० टक्के तर मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्के शुल्कवाढ करण्याच्या निर्णयाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महासभेच्या अंतिम मंजुरीनंतर ही दरवाढ लागू होईल. 

आत्तापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या शुल्कात उपचार मिळत होते, मात्र यापुढे मोफत उपचार देण्याच्या अटीवरच गटनेत्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

पालिका रुग्णालयात मुंबईसह मुंबईबाहेरील रुग्णही उपचार घेण्यासाठी येत असतात. यामध्ये केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या तीन रुग्णालयांवर पालिका वर्षाला ६०० ते ७०० कोटी रुपये खर्च करते. त्यापैंकी दहा टक्केही उत्पन्न पालिकेला मिळत नाहीत... तशीच अवस्था इतर रुग्णालयांची आहे. 

या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी रुग्णसेवेच्या शुल्कात ७५ ते १०० टक्के दरवाढीचा प्रस्ताव मांडला होता. तसेच मुंबईबाहेरील नागरिकांना अतिरिक्त २० टक्के शुल्काची शिफारस केली होती. 

त्यावेळी दरवाढीला विरोध झाला होता. मात्र काल मात्र शुल्कवाढीला मंजुरी दिली गेलीय.